१. सरदार पटेल यांचा पुतळा जगातला सर्वांत उंच पुतळा झाला आहे. १८२ मीटर उंचीचा हा स्टॅच्यु ऑफ युनिटी  अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे. चीनमध्ये स्प्रिंग टेंपलमधली बुद्धाची मूर्ती १५३ मीटर उंच आहे. हा आतापर्यंतचा जगातली सर्वांत उंच पुतळा होता. आता सरदार पटेलांचा पुतळा सर्वांत उंच पुतळा आहे.
२. स्टॅच्यु ऑफ युनिटी बघायला देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक येणार हे लक्षात घेऊन पर्यटकांच्या सोयीसाठी खास ट्रेन चालवली जाणार आहे. युनिटी एक्स्प्रेस राजकोटहून सलग १२ दिवस असेल.
३.दररोज किमान १५००० पर्यटक या पुतळ्याला भेट द्यायला येतील असा गुजरात सरकारचा अंदाज आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे लिफ्टची सोयही करण्यात आली आहे. एका वेळी २०० लोक बसू शकतील एवढी मोठी ही लिफ्ट आहे.
४. या पुतळ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर एक टेंट सिटी बनवण्यात येणार आहे. हे पर्यटकांसाठी उभारलेलं गाव असेल. इथून पुतळा व्यवस्थित दिसू शकेल.प्रत्यक्ष पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागणार आहे. या पुतळ्याच्या दर्शनासाठी ३५० रुपयांचं तिकिट काढावं लागेल, असं काही माध्यमांचं वृत्त आहे. भविष्यात ऑनलाईन तिकिटांची सोयही करण्यात येईल.
५. पुतळा दुरूनसुद्धा बघता यावा यासाठी एका ठरावीक लोकेशनवर भारत भवन नावानं पर्यटक निवास बनवण्यात आला आहे. खास या पुतळ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे राहायची सोय होऊ शकते. ५२ खोल्यांची इथे व्यवस्था आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours