बीड - मुलींना पाहून डोळा मारत टपोरिगिरी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. मुलीकडे एकटक पाहात डोळा मारणाऱ्या तरुणाला बीड जिल्हा न्यायालयानं तीन वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावलीय. अकरा महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत पोलिस तपास आणि साक्षीदारांच्या साक्षीमुळे शुल्लक वाटणाऱ्या घटनेत कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिलाय.
शिरूर तालुक्यातील भणकवाडीतील युवती महाविद्यालयात जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होती. यावेळी गावातील रोडरोमिओ ज्ञानेश्वर वीर यानं तिच्याकडे एकटक पाहात डोळा मारला. त्यानंतर मुलगी घाबरून रडू लागली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही याची गंभीर दखल घेत चौकशी करून चार महिन्यात दोषारोप पत्र न्यायालयात सादर केलं.
या प्रकरणी चार महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या दोषारोप पत्रावर गुरुवारी बीड जिल्हा न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयानं या रोडरोमिओला तीन वर्ष सक्त मजुरी आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावत जन्माची अद्दल घडवलीय. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी निभावलेल्या भूमिकेचं सर्व स्तरातून कौतूक होतंय.
अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्यामुळे शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना व युवतींना समाजात सहजतेनं वावरता येत नाही. चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेतील आरोपीला बीड जिल्हा न्यायालयानं जी शिक्षा सुनावली आहे, ती या सर्व गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असणाऱ्या टपोरींना दिलेली चांगलीच चपराक असल्याचं म्हटल्या जात आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours