मुंबई : मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडे हा अहवाल सुपुर्द करण्यात आला आहे. 

या अहवालातून महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती नेमकी काय आहे, याबाबतची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे. 

मराठा आरक्षणाबाबत इतरही जातीतील लोकांचं मत जाणून घेण्यात आलं आहे. यामध्ये सर्व जातींनी मराठा समाजाला आऱक्षण देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं आहे. 

-मराठा समाजातील 98 टक्के लोकांनी आरक्षण मिळायला हवं, अशी मागणी केली 

-कुणबी मराठा समाजातील जवळपास 90 टक्के लोकांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं, असं म्हटलं आहे

-जवळपास 90 टक्के ओबीसी समाज मराठा आरक्षणाच्या बाजूने

-मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे असं 61.78 टक्के लोकांना वाटतं

-आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी त्या समाजातील 25 टक्के लोकं दारिद्र रेषेच्या खाली असणं गरजेचं, मराठा समाजातील 37 टक्के लोकं दारिद्र रेषेखाली

ही आकडेवारी मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात असल्याची सूत्रांची माहिती आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours