भंडारा, दि.16 (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रत्येक महिन्याला लोकराज्य विशेषांक काढण्यात येतो. नोव्हेंबर महिन्यातील काढण्यात आलेल्या हा विशेषांक अतिशय दर्जेदार, वाचनीय आणि माहितीपुर्ण असा अंक आहे. या अंकामध्ये विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा विस्तृतपणे मांडण्यात आला आहे. हा विशेषांक अतिशय दर्जेदार, वाचनीय आणि माहितीपुर्ण असा अंक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लोकराज्य अंक घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले आहे.
नोव्हेंबरमधील लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधूरी थोरात जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. अशोक ब्राम्हणकर, डॉ. मेश्राम व डॉ. माधूरी माथूरकर आदी उपस्थित होते.
गेल्या चार वर्षात महाराष्ट्राने विविध क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी केली. महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घातला आहे. विविध क्षेत्रात असलेल्या पहिला क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळाले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, पर्यटन, पायाभूत सुविधा यांमध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती लक्षणीय ठरली आहे. गेल्या चार वर्षात विविध क्षेत्रामध्ये जो विकास झाला, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री, राज्यमंत्री यांनी नोव्हेंबरच्या विशेषांकात लेखाजोखा मांडला आहे. या अंकाची किंमत फक्त 10 रुपये असून प्रत्येकाने हा खरेदी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी यावेळी केले.
Post A Comment:
0 comments so far,add yours