मुंबई: सध्या रोड अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ट्रॅफिकच्या नियमांचं काटेकोर पालन करा, असा सल्ला पोलिसांकडून वारंवार दिला जातो.
मुंबई पोलिसच जर ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य लोकांकडून काय अपेक्षा करणार असा सवाल निर्माण झाला आहे. कारण मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर लोकांनी एक फोटो टाकलाय, ज्यामध्ये पोलिसच ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे.
या प्रकरणाची मोठी चर्चा झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours