नाशिक - भाजपची कुठलीही विचारधारा बदलेली नाही. एखादा गुंड व्यासपीठावर आला म्हणजे त्याने भाजपमध्ये प्रवेश केला असं मुळीच होत नाही आणि स्वतःला तो कार्यकर्ता म्हणत असेल तर ते देखील चुकीचंच आहे. आम्ही आमच्या पक्षात गुंडांना अजिबात संरक्षण देत नाही. आम्ही फक्त मतदार वाढवतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.
नाशिक मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील संघटनांविषयी आढावा घेण्यासाठी रविवारी दुपारी ते नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळ्यात शनिवारी एक जाहीर सभा पार पडली. फोटो न टाकल्याच्या कारणावरून सभेत भाजप नेते अनिल गोटे आणि भामरे यांच्यात वाद झालेत. आगामी धुळे महापालिकेची निवडणूक ही गोटे किंवा भामरेंची नसून, ती पक्षाची आहे. त्यामुळे दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले
Post A Comment:
0 comments so far,add yours