कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर तवेरा गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेसह तीन मुली जागीच ठार झाल्या. तर गाडीतील इतर काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर तवेरा गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या डोहात गेली. गाडीचा टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. अपघातामध्ये गाडीत असणाऱ्या प्रवाश्यांना जबर मार लागला. यामध्येच एकूण चार प्रवासी जागीच ठार झाले आहेत.
या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण हे सांगली जिल्ह्यातील कवठेमंहकाळचे रहिवासी आहेत. जान्हवी तांदळे, अश्विनी तांदळे, धनश्री माने, अनिशा तांदळे अशी मृतांची नावे आहेत. 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातात ठार झालेल्या प्रवाश्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसंच अपघाताताील जखमींना उपचारासाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, या अपघातातबाबत कळाल्यानंतर अपघातग्रस्तांच्या मूळ गावी मोठा आक्रोश झाला. तांदळे कुटुंबातील तर दोन मुलींसह एका महिलेनं या अपघातात आपला जीव गमावला. त्यामुळे या कुटुंबावर मोठा आघात झाला असून संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours