मौजा सोनेगाव येथे मंडई निमित्त संगीत पंख फुटलेले पाखरु नाटकाच्या उद्घाटन समारोह प्रसंगी उद्घाघाटनीय भाषणातुन जि. प. अध्यक्ष रमेशजी डोंगरे बोलले की आजची युवा पीढ़ी व्यसना च्या आहारी जात असल्याने समाजात व्यसना चे प्रमाण वाढत आहे. आजचा युवक शिक्षित असुन त्याने जाग्रुत रहाने गरजेचे आवश्यक आहे.आजच्या मंडई च्या निमित्त पाहुण्यांचे सोय पाणी कमी दारु पिणे आणि पाजण्याचे प्रमाण वाढत असल्याने झाडी पट्टीतील मंडई ह्या दारु विक्रेत्या करिता पर्वणी ठरु पहात आहेत.तसेच त्यांनी व्यसनाच्या अनेक दु:शपरिनामावर प्रकाश टाकला.    
                      आजच्या नाटकाचे लेखक प्रा. हरिश्चंद्र गेडाम तिरखुरी हे ग्रामीण परिसरातील असुन त्यांनी आपल्या लेखनी च्या माध्यमातुन अनेक नाटके झाडी पट्टीच्या रंगमंचावर सादर केलीत त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेवुन नवयुवक नाट्य मंडलाच्या वतीने शाल श्रीफल देवुन सत्कार करण्यात आले.
        याप्रसंगी प्रमुख उपस्थिती जि. प. अध्यक्ष रमेशजी डोंगरे, जि. प. सदस्य शुध्दमताताई नंदागवली, जि. प. सदस्य मनोहरजी राऊत, सरपंच उत्तम भागडकर, मा. जि. प. सदस्य गोपी भेंडारकर सरपंच अमोल आजबले व बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours