मुंबई, 5 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धनत्रयोदशीच्या निमित्तानं एक खास व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये राज यांनी धन्वंतरीच्या माध्यमातून देशाच्या परिस्थितीवर मार्मिक टीका करत पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांच्या या व्यंगचित्रात देश आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर आरोग्याची देवता असलेली धन्वंतरी देशातील लोकांना भारताच्या आरोग्याबद्दल माहिती देताना दिसत आहे.
‘गेल्या साडेचार वर्षात त्याच्यावर खूपच अत्याचार झाले आहेत. पण आता काळजीचं कारण नाही. लोकसभा निवडणुकीनंतर तो शुद्धीवर येईल,’ असं धन्वंतरी भारतीय नागरिकांना सांगत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours