मुंबई, 05 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन ही भेट घेतली.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या 'उग्रलेख' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहेत. या पुस्तकाचे निमंत्रण देण्यासाठी आव्हाड आज मातोश्रीवर पोहोचले होते. आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली.
काल शनिवारी उग्रलेख हा माझ्या पुस्तक प्रकाशनाची आंमत्रण पत्रिका आई , बाबांचा चरणी ठेवली त्यांनतर शरद पवार यांना दिली आणि आज औपचारिकरित्या उध्दव ठाकरे यांना दिली अशी माहिती आव्हाड यांनी टि्वट करून दिली.
विशेष म्हणजे, उग्रलेख पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी शरद पवार यांना पहिले आमंत्रण दिले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि सुशील कुमार शिंदे यांना दिले आहे.
मागील महिन्यात १२ आॅक्टोबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
Post A Comment:
0 comments so far,add yours