मुंबई: ऑक्टोबर हिटमधून मुंबईकरांची नुकतीच सुटका झाली. पण कालचा दिवस म्हणजेच 3 नोव्हेंबर हा गेल्या 15 वर्षातील नोव्हेंबर महिन्यातला सर्वात जास्त तापमान असलेला दिवस ठरला. मुंबईमध्ये काल (शनिवारी) 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या 15 वर्षातील नोव्हेंबर महिन्यातलं मुंबईमधील हे सर्वात जास्त तापमान आहे. याआधी 2003 मधील नोव्हेंबर महिन्यात 37.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं.
दरम्यान, हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 4 नोव्हेंबर आणि 5 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच 6 तारखेनंतर गोव्यासह महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours