मुंबई: शेतकरी वर्गाची दयनीय अवस्था आता झाली आहे. दुष्काळ परिस्थिती हाताळण्याची कवडीची आस्था आताच्या सरकारमध्ये नाही अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केली.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित शेतकरी हक्क परिषदेत शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. लाला झेंड्याखाली आज प्रथमच आलो. माझ्या घरात डाव्या विचाराच्या नेत्यांच फोटो आमच्या घरी असायचे. माझे घर डाव्या बाजूचे पण मी काँग्रेस विचारांचा असायचो. डाव्या विचारसरणीचे घरातील विचार बदलण्यासाठी तीस वर्ष मला लागले असंही पवार यांनी सांगितलं.वाहून घेतलेले, कष्टाळू डाव्या विचाराचे, अन्याय विरोधात संघर्ष करण्याची भूमिका डावी विचाराधारा आहे असंही पवार म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours