मुंबई, 12 नोव्हेंबर : मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागली असली तरी मुंबईकरांना मात्र थंडीसाठी अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईचं वातावरण अजून काही दिवस उष्ण राहणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.

राज्यात थंडीचा जोर वाढत असला तरी, मुंबई आणि पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्यांलगतच्या भागात अजुनही उष्णतेचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याने आणखी काही काळ थंडी लांबणीवर जाणार आहे. एकंदर परिस्थितीमुळे मुंबईकरांना गरमीच्या वातावरणातून सुटका होण्यासाठी डिसेंबर महिना उजडावा लागणार की काय? असा प्रश्न पडलाय.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईचं वातावरण अजून काही दिवस उष्ण राहणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुते यांनी न्यूज18 लोकमतला दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours