पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जवान केशव गोसावी शहीद झाले. केशव यांचं पार्थिव जम्मू वरून नाशिकच्या ओझर विमानतळावर आण्यात आलं आणि त्यानंतर हे पार्थिव केशवच्या सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी या गावी आण्यात येणार आहे. तिथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

अवघ्या 29 वर्षांचा केशव गेल्या 10 वर्षांपासून देश सेवेसाठी सीमेवर तैनात होता. केशवच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. दुख:द बाब म्हणजे केशव यांच्या पत्नी या गरोदर असून आज त्यांना प्रसुतीसाठी दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू होती. मात्र ही गोड बातमी येण्यापूर्वीच काळाने केशव यांच्यावर घाला घातला आणि संपूर्ण परिवार दुःखात होरपळून निघालं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours