अहमदनगर: अहमदनगर तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात पुर्ववैमन्यासातून झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ठार झालेल्या २५ वर्षीय युवकाचं नाव योगेश एकनाथ जाधव, तर एकनाथ जाधव हा जखमी झाला आहे. शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोपट आदमाने याला अटक केली आहे. पोपट हा सैन्यातून निवृत्त झाला असून, त्याला मिळालेल्या बंदुकीतून त्याने गोळ्या झाडल्याची माहिती आहे. 
पोपट गणपत आदमाने याने कामतशिंगवे शिवारात स्वत:च्या रायफलीमधून योगेश एकनाथ जाधव आणि त्याचे वडील एकनाथ जाधव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये योगेश एकनाथ जाधव हा जागीच ठार झाला तर त्याचे वडील एकनाथ जाधव हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पोपट आदमाने याला अटक केली. पोपट आदमाने हा 
या घटनेमुळे कामतशिंगवे शिवारात एकच खळबळ उडाली आहे. ठार झालेल्या योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, एकनाथ जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोपट आदमाने हा सैन्यातून निवृत्त झाला असला तरी, त्याच्याकडे रायफल कशीकाय आली? ती बाळगण्याचा त्याच्याकडे परवाना होता का? या दोन कुटुंबातील वादाचं नेमकं कारण? आदी सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पोलीस आता पोपट आदमाने याची कसून चौकशी करत आहेत
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours