नाशिक, 2१ नोव्हेंबर : येवला-मनमाड रोडवर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी येवला येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
पुणे-इंदुर महामार्गावर अनकाई किल्ल्याजवळ पहाटे ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मारुती इरटिका कार ही मनमाडच्या दिशेनं कोपरगावला जात होती. तर आयशर ट्रक हा मनमाडच्या येवल्याकडे येत होता. कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकवर कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. यातील दोन पुरुषांची ओळख पटली असून पोलिसांनी नातेवाईकांना तशी माहिती दिली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours