‘सदैव अटल’ समाधी तयार
दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या समाधीस्थळी "सदैव अटल" राष्ट्रीय स्मृती पार्क तयार झालं आहे. आज या समाधीस्थळी पहिली प्रार्थना सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह सर्व विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे.
देशातल्या सर्वात मोठ्या दुमजली पुलाचे उद्घाटन
ईशान्य भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांदरम्यान बांधण्यात आलेल्या ढोला-सदिया दुमजली पूल पूर्णपणे तयार झाला आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे.  देशातला पहिला आणि आशिया खंडातला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वात लांब पूल आहे. 1996 साली दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या पुलाला मंजुरी देण्यात आली होती. 25 डिसेंबर रोजी अर्थात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी हा पूल सर्वांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
छत्तीसगड मंत्रिमंडळाचा विस्तार
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. या विस्तारात 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे.  यामध्ये टीएस सिंह देव आणि ताम्रधवाज साहू हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.
बुलेट ट्रेनबाबतचे निर्णय मंत्रिमंडळ समितीच्या शिफारशीनंतरच!
मुंबई-अहमदाबाद जलदगती रेल्वेमार्गाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाले आहेत, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळात दि.7 सप्टेंबर 2017 रोजीच्या बैठकीत उपसमितीच्या शिफारशीनुसार विचारविनिमय होऊन पुढील निर्णय घेण्यात आले आहेत. एक विशेष उपयोजिता वाहन गठन करणे आणि त्यामध्ये रेल्वे मंत्रालय, भारत सरकार यांचे 50 टक्के, गुजरात शासनाचे 25 टक्के तसंच महाराष्ट्र शासनाचे 25 टक्के भागभांडवल घेण्यास  तत्वता मान्यता देण्यात आली.
ट्रेन 18 आता ट्रॅकवर
180 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या देशातील पहिल्या सुपरफास्ट "ट्रेन 18" ची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. कोटा जंक्शन ते कुर्लासी स्टेशन दरम्यान ही चाचणी पार पडली होती. त्यानंतर आता ही रेल्वे नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours