पुरंदर:  दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आलेलं  केंद्राचं पथक गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचलं. पण पथकाला पोहोचायला उशीर झाल्यानं अंधार पडला होता. त्याच अंधारात पथकातल्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शेतकऱ्यांच्या नशिबात कायम अंधारच असतो किमान मदत पथकाने तरी उजेडात यायचं होतं अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

सातारा जिल्ह्यातील पहाणीनंतर हे पथक पुरंदरला आलं. यात  केंद्रीय अर्थ विभागाचे सह संचालक सुभाषचंद्र मीना, खाद्यान्न विभागाचे उप महाव्यवस्थापक एम. जी. टेंबुरने, तसेच पशुसंवर्धन विभागाचे विजय ठाकरे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह मोठा ताफा पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे आणि राजुरी येथील दुष्काळाची पाहणी करणार होते.

मावडी सुपे इथं पोहोचतानाच  अंधार झाल्याने पथकाला पाहणी करता आली नाही. मात्र स्थानिकांशी पथकाने चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत आपली गाऱ्हाणी पथकासमोर  मांडली .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours