पुणे, 20 डिसेंबर : एका तरुणाने चखना मिळाला नाही म्हणून दारूच्या नशेत गॅलरीत असलेल्या कबुतराच्या अंड्यांचं ऑम्लेट करून खाल्ल्याचा प्रकार विमाननगरमध्ये घडला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरानंतर तरुणाने आत्महत्या केली आहे.
कबुतराची अंडी खाल्ल्यानंतर तरुणाने त्यावर मद्यप्राशन केलं. नंतर त्याने विचित्र वागण्यास सुरुवात केली. यानंतर थेट 8व्या मजल्यावरून उडी मारून या तरुणाने आत्महत्या केली आहे. या विचित्र प्रकारामुळे संपूर्ण पुणे हादरलं आहे.
तुहीन मुखोपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मयत तुहीन हा मूळचा बंगालचा आहे. विमाननगर परिसरातील एका इमारतीत तो पत्नीसह भाड्याने राहतो. वोडाफोन कंपनीत तो कामाला होता.
मंगळवारी रात्री कामावरून परत आल्यानंतर तो दारू पिण्यासाठी बसला. पण त्याला चखण्यासाठी काही मिळालं नाही त्यामुळे त्याने घरातील बालकनीत असलेल्या कबुतराच्या घरट्यातील अंडी काढून त्याचं ऑम्लेट करून खाल्लं आणि त्यावर मद्य प्राशान केलं. यानंतर काही वेळातच तो विचित्रपणे वागू लागला अशी माहिती मयत तुहीनच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours