मुंबई, 18 डिसेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवणार असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना एकटी लढली तरी आपण एकटे निवडणूक लढवण्यास समर्थ असल्याची भूमिका मांडल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपच्या सर्व आमदारांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा झाल्याचं कळतंय. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना जर सोबत आली तर चांगली गोष्ट आहे. पण जर शिवसेना एकटी लढली तर आपण एकटे निवडणूक लढण्यासाठी समर्थ आहोत. भाजप हाच राज्यातला नंबर वन पक्ष आहे असं म्हणाले. 
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराममध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 3 राज्यात सत्ता स्थापन केली. काँग्रेसचा विजय जरी झाला असला तरी तुम्ही खचून जाऊ नका, आपल्या महाराष्ट्र मिशन मोडमध्ये जायचं आहे. केंद्रीय भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा हा रोड मॅप आहे असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours