मुंबई, 20 डिसेंबर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सामनाच्या अग्रलेखातून राम मंदिर निर्माण संदर्भात मोदी सरकारवर बोचरी टिका केलीय. एव्हढच नाहीतर सरसंघचालकांनी मोदी सरकारचे कसे कान टोचलेत, याचा ठाकरी शैलीत समाचारही घेतलांय. अयोध्येतील बाबरी मस्जीद पाडणार्यावरील खटलेही मोदी सरकार काढू शकत नाही का...? असा प्रश्नं विचारत बाबरीचे कोर्ट बरखास्त करण्याची आक्रमक मागणी करून नव्या वादाला तोंड फोडलंय. आजच्या सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी, मोदी सरकारवर आक्रमक टिका करणारे अनेक ठाकरी बाणच सोडलेत.
सामना अग्रलेख
'श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात, ‘संयम.’ गडकरी म्हणतात, ‘सहमती’ व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’ पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या!'
'भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्था, संघटना जागोजाग धर्मसभा, संत संमेलने घेऊन राममंदिरावर ‘चिंतन’ करीत आहेत. आता हा चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘ऍक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे.'
' ‘मीपणा नको’ हाच गीतेचा संदेश असल्याचे भागवत सांगतात. ‘जे मी करतो तेच चांगले. मी केले, मी केले, मी केले असा अहंकार बाळगणारे काय कामाचे?’ हा गीतेचा मुख्य संदेश श्री. भागवत यांनी सांगणे हे सोनाराने कान टोचण्यासारखेच आहे. पण तीन राज्यांत जनतेने लोहारी घण घालूनही कुंभकर्ण झोपेतून उठायला तयार नाही.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours