जिल्हा प्रतिनिधी शमीम अकबानी

भंडारा शहरात दि.१ डिसेंबर २०१८ पासून दुचाकीस्वाराना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे भंडारा शहरातील गांधी चौक, मोठा बाजार, छोटा बाजार, बसस्टँड या वर्दळीचे ठिकाणी हेल्मेट घालुन भाजी घेणे तसेच किराणा व इतर गरजेचे सामान खरेदी करणे नागरिकांना अशक्य झाले आहे. तसेच जेष्ठ नागरिकांना अपघाताला समोरे जावे लागु शकते तसेच सकाळी दुध वाटप करणारे दुधावाले यांना हेल्मेट घालुन सकाळी थंडी असल्यामुळे व धुके असल्यामुळे समोरचे दिसत नाही त्यामुळे त्यांना विनाकारण समस्यांचा सामना करावा लागत आहे.करीता नागरिकांच्या समस्यांचा विचार करून हेल्मेटची सक्ती भंडारा शहरात न करता नॅशनल हायवे वर करावी व भंडारा शहरातील हेल्मेटची सक्ती हटविण्यात यावी  अशा प्रकाच्या निवेदन धनराज साठवणे माजी नगरसेवक तथा काँग्रेस नेते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब यांना  देण्यात आला याप्रसंगी सर्वश्री प्यारेलाल वाघमारे जि. प सदस्य,सचिन घनमरे शहर काँग्रेस      
अध्यक्ष,कमल साठवणे,पृथ्वीराज तांडेकर,जीवन भजनकर,गणेश लिमजे,प्रकाश डोनेकर,संजय वरगतीवर, संजय वाघमारे, महेश माकडे,रंगनाथ खराबे,हरिभाऊ भोंगडे, सोमदासजी गभणे, शिवचंद खेत्रे, आकाश मेश्राम ,धमदीप धारगावे,दिलीप मेश्राम,विनायक दिवटे,मिलिंद जोशी,बादल साठवणे इत्यादी कार्यकर्ते उपस्तीत होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours