मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्याची आज सांगता झाली. आज तिसऱ्या दिवशी राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका सप्तश्रृंगी वणी देवीला अर्पण केली. तर शर्मिला ठाकरे यांनी आई एकवीरा देवीला लग्नपत्रिका अर्पण केली. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबात लवकरच लग्नाच्या धामधुमीला सुरुवात होणार आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours