पंढरपूर, 22 डिसेंबर : शिवसेना पक्षप्रमुखांच्या महासभेला आणखी दोन दिवसांचा अवधी असताना श्री विठुरायाची पंढरी नगरी शिव आणि राम भक्तांनी गजबजून गेली आहे. पंढरपूर शहरचं नव्हे तर पंढरपूरकडे येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मार्गावरील हॉटेल, लॉज, धर्मशाळा आणि विश्रामगृह हाऊसफुल्ल झालीत. आता उत्सुकता आहे ती 24 डिसेंबरच्या महासभेची आणि पक्षप्रमुख काय बोलणार याची.
24 डिसेंबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या महासभेचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहचले असून चंद्रभागा नदीच्या तीरावरील ही महासभा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तानाजी सावंत, शिवाजी सावंत आदी तळ ठोकून आहेत.
राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केल्याचं राम करद म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे.
तर या उद्धव ठाकरे यांच्या या विराट महासभेला तब्बल 5 लाख शिवसैनिक येणार असल्याची माहिती विनायक मेटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे पंढरपूरला आता कार्तिकी एकादशीचं स्वरुप येणार आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातून तमाम शिवसैनिक पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours