मुंबई, 22 डिसेंबर : बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी 7 जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. पगारवाढीसह अन्य काही मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट कर्माचाऱ्यांच्या वेतनापासून इतर अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवर आंदोलन आणि संप करुनही सरकारकडून दखल घेतली जात नाही, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत मागण्या?

- बेस्टचा अर्थसंकल्प वेगळा न मांडता त्याचा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात समावेश करावा

- वेतनासंबंधी तातडीने निर्णय घ्यावा

- वेळीच तोडगा न काढल्यास संप अटळ

बेस्ट कर्मचारी आणि सरकारमध्ये तोडगान न निघाल्यास 7 जानेवारीपासून जवळपास 30 हजार बसेस रस्त्यावर उतरणार नाहीत, असा अंदाज आहे. बेस्ट कर्मचारी आणि सरकारच्या या संघर्षाचा मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 जानेवारीपर्यंत याबाबत काही तोडगा निघतो का, हे पाहावं लागेल
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours