पोलादपूर: आंबेनळी घाट बस अपघातप्रकरणी अखेर पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत चालक प्रशांत भांबीड यांच्यावर पोलादपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 
आंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेत तब्बल 29 जणांनी आपला जीव गमावला होता. या अपघातात फक्त प्रकाश सावंत देसाई हा एकमेव व्यक्ती वाचला. त्यानंतर या अपघाताप्रकरणी प्रकाश सावंत यांच्यावरही संशयाची सुई होती. पण आता मृत चालक प्रशांत भांबीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
28 जुलै रोजी सकाळी साडे 10 च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला. या अपघातात बसमधील 29 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणा-या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. 
मात्र, नंतर हेच प्रकाश सावंत संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. कारण मृतांच्या कुटुंबीयांनी प्रकाश सावंत हेच गाडी चालवत होते आणि अपघात होताना त्यांना लक्षात आले असता त्यांनी गाडीतून उडी टाकली असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours