मुंबई, 5 जानेवारी : राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदासंघातील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा समाजाच्या 16% आरक्षणाला त्वरित स्थगिती द्या, अशी मागणी या याचिकाद्वारे इम्तियाज जलील यांनी केली आहे.
काय आहे इम्तियाज जलील यांची मागणी?
- इम्तियाज जलील यांची मराठा आरक्षणाविरोधात याचिका
- न्या. गायकवाड आयोगाचा अहवाल रद्द करा
- मराठा आरक्षणाचा SEBC 2018 कायदा रद्द करा
- इम्तियाज जलील यांची अॅड. सतिश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका
- दि. 31.12.2018 रोजी सादर केली याचिका
मराठा आरक्षण आणि कायदेशीर लढाई
मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याआधीही याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.
याआधी आघाडी सरकारनेही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्याने त्याला स्थगिती मिळाली होती. आता फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हे आरक्षणही कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours