मुंबई, 5 जानेवारी : राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निकम यांच्या नावावर चर्चा झाली. याबाबत एका मराठी वेबसाईटने वृत्त दिलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याबाबत राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याच बैठकीत जळगाव लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्याबाबत खलबतं झाली असल्याची चर्चा आहे. पण निकम यांची सहमती घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे 6 उमेदवार निश्चित
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात केलीय. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सहा संभाव्य उमेदवार कोण असतील याची पहिली यादी राष्ट्रवादीने तयार केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागावाटपाचा गुंता सुटला आहे.
राष्ट्रवादीने आपल्याला मिळालेल्या मतदार संघात उमेदवार निश्चित करायला सुरूवात केलीय. रायगड, जळगाव, बीड, परभणी, उस्मानाबाद, कोल्हापूर या जागेबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Post A Comment:
0 comments so far,add yours