मुंबई : पेण जवळच्या जिते इथं रेल्वेखाली येऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली. रेल्वे रुळाजवळ हे कामगार काम करत होते. मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने रेल्वे आलेली कळलीच नाही. त्या रेल्वेने सर्व कामगारांना उडवलं. घटनास्थळी पोलीस आणि रूग्णावाहिका पोहोचली मात्र त्या सर्व कामगारांचा मृत्यू झाला. रेल्वेच्या डबल ट्रॅकचं काम सुरू होतं. काही कामगार जखमी झाले असून त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
नगरमध्ये वाळू तस्कारांचा हैदोस
अहमदनगर - नगरमध्ये वाळू तस्करांनी हौदोस घातलाय.  वाळू ट्रकने 3 जणांना चिरडल्यान नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पारनेर तालुक्यातील पळसे इथं ही घटना घडलीय. पारनेर तालुक्यात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातल्याची तक्रार वारंवार होतेय मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. हकनाक तीन जणांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours