यवतमाळ : वादामुळे गाजलेल्या यवतमाळ इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात सरकारचे कान टोचले आणि राजकारण्यांना दोन शब्दही सुनावले. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावण्यामुळे जो वाद झाला होता तो धागा पकडून गडकरी यांनी मतभेद असावेत मनभेद नसले पाहिजे असं स्पष्ट केलं.
ते म्हणाले, "राजकारण्यांनी साहित्य आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये. पण त्याच बरोबर राजकारण्यांना सांस्कृतिक व्यासपीठ वर्जही असता कामा नये. मतभेद असायला काहीच हरकत नाही मात्र त्यांचे मनभेद असता कामा नये. साहित्यिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत असंही त्यांनी सांगितलं."
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours