नांदेड, 28 जानेवारी : मराठी सिनेअभिनेत्री केतकी माटेगावकरने नांदेडमधील एका कार्यक्रमात केतकी फाऊंडेशनची स्थापना करणार असल्याची घोषणा केली आहे. तिच्या या निर्णयामुळे संपूर्ण नांदेडकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गोर-गरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी केतकी फाऊंडेशन मदत करणार असल्याचं तीने सांगितलं आहे. केतकीने उचललेल्या या पाऊलामुळे अनेकांना मदत होणारा आहे. नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तिने ही घोषणा केली आहे. यावेळी केतकीला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
या कार्यक्रमामुळे तिने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. गरीब मुला-मुलीना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी आपण काम करणार असल्याचं तिने सांगीतलं. याच कामासाठी केतकी फाऊंडेशन स्थापन करणार असल्याचं ती म्हणाली.
केतकी माटेगावर ही एक पाश्वगायिका आहे. त्याचबरोबर ती एक उत्तम आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मराठी सिनेमांतून तिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात घर केलं. आताही तिच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात तिचा दर्जा आणखी उंचावला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours