मुंबई, 28 जानेवारी : येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती अजून झालेली नाही. मात्र, राज्यातील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या नात्यांची युती मात्र झाल्याची माहीती समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि भाजपचे मंत्री रणजित पाटील आता व्याही-व्याही होणार आहेत.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव युवासेना सचिव पूर्वे़श सरनाईक यांचा विवाह भाजपचे आमदार आणि गृहराज्य मंत्री रणजित पाटिल यांच्या मुलीशी होणार आहे. नुकताच सरनाईक-पाटीलांमध्ये कौटूंबिक पद्धतीने सुपारीचा कार्यक्रम पार पडला.
पूर्वेश सरनाईक हे ठाण्याचे नगरसेवक तसेच युवासेनेचे सचिव आहेत. पुढच्या महिन्यात फेब्रुवारीत साखरपुडा तर मे महिन्यामध्ये त्यांचा विवाह सोह़ळा पार पडणार आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत अद्याप युती झाली नसली तरी त्यांच्या नेत्यांमध्ये ही अनोखी युती पाहायला मिळाली आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. युतीचं अडलेलं घोडं पुढं दामटण्यासाठी जागा वाटपासंदर्भात भाजपने एक पाऊल पुढे टाकलं आहे. 2014 पेक्षा 2 अधिक जागा देऊन लोकसभेत शिवसेनेशी युती करण्याचा नवा फॉर्म्युला भाजपनं तयार केला, असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
2014 मध्ये भाजपनं 24 तर शिवसेनेनं 2 जागा लढवल्या होत्या आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांच्या वाट्याला आल्या होत्या. मात्र, यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला 22 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
तसंच काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव देखील भाजप शिवसेनेसमोर ठेवणार आहे. ज्यामध्ये हिंगोली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या जागेचा समावेश असल्याचं कळतंय.
उद्या सोमवारी जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीला सुरूवात होणार आहे. त्यावर या नव्या फॉर्म्युलावर चर्चा होऊन त्या अनुशंगानं शिवसेना पक्षप्रमुखांशी संपर्क साधला जाऊ शकतो.
दरम्यान, अलीकडेच भाजपच्या नेत्यांनी युतीबद्दल वेगवेगळी विधान केलं होती. राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केला होता.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours