औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबादमधल्या सभेत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत अडथळे आणले. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर काही वेळात मध्येच विद्यार्थी उठून उभे राहिले आणि त्यांनी फलकही फडकावले. आकांक्षा देशमुख हिला न्याय मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी आकांक्षाचा एमजीएम मेडिकल कॉलेज च्या मुलींच्या वस्तीगृहात खून झाला होता. या घटनची चौकशी करून सत्य उघडकीस आणा अशी त्यांची मागणी होती.

 विविध विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.  त्यामुळे आता 100 कोटींची काम सुरू होणार आहेत. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.
अचानक सुरू झालेल्या घोषणाबाजीने मुख्यमंत्रीही गोंधळून गेले. "एमजीएमच्या या मुलांच काय आहे? आता खाली बसा, घोषणा पुरे झाल्या, मी तुम्हाला नंतर भेटतो. आता तुमची बातमी आली तुम्ही खाली बसा नाहीतर कारवाई करतो"असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुलांना खाली बसायला सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours