मुंबई, 22 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करावी यासाठी शिवसेना खासदारांकडून पक्षावर दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. खासदारांच्या या भूमिकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांची कानउडणी केल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
शिवसेनेच्या काही खासदारांनी माध्यमांसोबत बोलताना भाजपसोबत पक्षाने युती करावी, अशी भूमिका व्यक्त केली होती. याद्वारे संबंधित खासदारांकडून युतीसाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षपणे का होईना, पण केला जात होता. त्यानंतर रागावलेल्या उद्धव यांनी आपल्या खासदारांना चांगलंच सुनावलं असल्याची माहिती सू्त्रांकडून मिळाली आहे.
'तुम्हाला युतीतच लढण्याची इच्छा असेल तर तुम्ही निवडणूकच लढवू नका,' अशा कठोर शब्दात युतीसाठी दबाव आणणाऱ्या खासदारांना मातोश्रीवरून फटकारण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, स्वतंत्र लढल्यास आपण जिंकून येऊ की नाही, याबाबत शिवसेना खासदारांना आत्मविश्वास नाही. त्यामुळेच युतीसाठीचा दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours