(२३-१-२०१९ व २४-१ ला महाआराेग्य मेळावा)
जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
भंडारा -----आराेग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय ,भारत सरकार व राष्ट्रिय आराेग्य अभियान सार्वजनिक आराेग्य विभाग, जिल्हा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने महाआराेग्य मेळावा बुधवार दि.२३-१-२०१९ व २४-१-२०१९ राेजी जिल्हा रुग्णालय येथे आयाेजित करण्यात आला आहे.
-----सदर महाआराेग्य मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी उद्धाटक मा.चंद्रशेखर बावनकुळे (पालकमंत्रि) भंडारा जिल्हा यांच्या हस्ते हाेणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.मधुकर कुकडे (भंडारा,गाेंदिया) तर प्रमुख मार्गदर्शन म्हणुन मा.खा.प्रफुल्ल भाई पटेल यांची सुद्धा या महाआराेग्य मेळाव्या मधे उपस्थिती राहणार आहे.सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी मधे डॉ.आ.परिणय फुके ,आ.रामचंद्र अवसरे,आ.चरण वाघमारे ,आ.राजेश काशिवार , भंडारा जि.प.अध्यक्ष रमेश डाेंगरे,प्रेमदास वनवे सभापती (आराेग्य समिती जि.प.भंडारा), सुनिल मेंढे (नगराध्यक्ष न.प.भंडारा) यांच्या उपस्थितीत हाेणार आहे.
------,सदर महाआराेग्य प्रसंगी बुधवार दि. २३-१-२०१९ ला हृदयराेग,मधुमेह,मुत्रपिंडाचे आजार,अस्थिराेग,मानसिक आजार,मिरगी(फिट),चर्मराेग,गुप्तराेग,एच.आय.व्हि./एड्स,कान,नाक,घसा,नेत्र,गर्भाशयाचे आजार,इत्यादी सर्व प्रकारच्या आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व आैषधाेपचार करण्यात येणार आहे.तसेच २४-१-२०१९ ला लहान मुलांचे संपुर्ण आराेग्य तपासणी व उपचार,रक्तदान शिबीर,एक्सरे,सी टी स्कँन ,साेनाेग्राफी व अपंगाना तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र वाटप हाेणार आहेत .या महाआराेग्य मेळाव्यात जास्तीत जास्त रुग्णांणी या शिबीरात स्वत:ची तपासणी करुन घेण्याचे आव्हाण डॉ.प्रमाेद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा व डॉ.प्रशांत उईके, जिल्हा आराेग्य अधिकारी भंडारा यांनी केले आहे।
Post A Comment:
0 comments so far,add yours