कोल्हापूर, 22 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांची सध्या वेगाने मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता निवडणुकीच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री झाली आहे. 'महाराष्ट्र क्रांती सेना' या मराठा क्रांती मोर्चानंतर स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 14 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा मतदारसंघ वगळता महाराष्ट्रातील 47 जागांवर महाराष्ट्र क्रांती सेना निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत दिली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours