चंद्रपूर: चंद्रपूरमधील रमाबाई नगर इथं दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सोनू साव (28) आणि गुड्डू साव( 32) अशी हत्या झालेल्या तरूणांची नावं आहेत.
रमाबाई नगरमध्ये बुधवारी रात्री 10 सुमारास हे हत्याकांड झालं आहे. धारदार शस्त्रांसह आलेल्या एका टोळक्याने आधी साव कुटुंबातील एका तरूणावर हल्ला करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या भावावरही हल्ला करण्यात आला. या हल्लात सोनू साव आणि गुड्डू साव या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हा हल्ला नक्की का करण्यात आला, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परंतु क्षुल्लक वादातून हे हत्याकांड झाल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
रमाबाई नगर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. मात्र अजूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours