गडचिरोलीत बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला.
अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने 15 ट्रक पेटवून दिल्याची चर्चा होती. या प्रकरणात आता नवीनच माहिती समोर येत आहे. ट्रक जाळण्यामागे अपघात हे कारण नसून इथल्या आदिवासींचा लोहखनिजाच्या उत्खननाला असलेला आधीपासूनचा विरोध हे कारण असल्याची माहिती आहे. लोहखनिज उत्खननाला स्थानिकांचा आधीपासूनच विरोध होता. त्यानंतर अपघात हे केवळ निमित्त ठरलं आणि स्थानिकांनी ट्रक जाळत आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, आधी अपघात आणि नंतर ट्रक जाळण्याची घटना यामुळे एटापल्लीत तणावाचं वातावरण आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours