औरंगाबाद: कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजपच्या 'आॅपरेशन लोटस'वर सुचक विधान केलं आहे. लवकरच कर्नाटकमध्ये आपली सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
औरंगाबादेत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. लोकसभा शक्ती केंद्र गटाचे कार्यकर्ते या मार्गदर्शन मेळाव्याला हजार होते. यावेळी, 'कर्नाटकमध्ये आपलं सरकार येऊ शकतं, गमावलेली राज्य पुन्हा आपल्या हातात येऊ शकतात', असा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे.
तसंच 'औरंगाबादेत 3 मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं अस्तित्वच नाही. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा नाही', असं सांगून पंकजा यांनी अप्रत्यक्षरित्या आपला सामना हा सेनेसोबत असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे तीन नाराज आमदार भाजपसोबत आहे. भाजप नेत्यांच्या मते सर्व काही व्यवस्थित झालं तर मकर उद्या गुरुवारी 17 तारखेला कर्नाटकात नवं सरकार बनू शकते.
Post A Comment:
0 comments so far,add yours