पुणे, 29 जानेवारी : पुण्यात पोलीस स्टेशनच्या हद्दील हत्या झालेल्या गंभीर प्रकार घडला आहे. काल रात्री अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोसावी वस्तीत एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी पाहता सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पोलीस स्टेशनच्या परिसरातच हत्या झाल्याने पुण्यात हल्लेखोरांना कसलंच भय उरलं नाही असचं दिसतंय. सकाळच्या दरम्यान तरुणाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू सापडते का? याचा आता पोलीस शोध घेत आहे.
दरम्यान, प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस आता परिसरातील लोकांची आणि मयत तरुणाच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अशा निर्दयीपणे एखाद्याची हत्या होते आणि आरोपी सहज फरार होतो. त्यामुळे आता पुण्यात सुरक्षा उरली का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. त्याचबरोबर मयत तरुणाची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours