मुंबई, 29 जानेवारी : मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झालं आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जॉर्ज फर्नांडिस मुंबईच्या कामगार चळवळीचे प्रणेते, एनडीएचे निमंत्रक होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
बिहारच्या राजकारणावर जॉर्ज फर्नांडिस यांची वेगळीच छाप होती. बिहारचा मुजफ्फरपूर हा फर्नांडिस यांचा मतदारसंघ होता. 1977, 1980, 1989,1991, 2004 असं 5 वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले होते. यातून त्यांच्या कामाचा अंदाज येतो.
या लढवय्या कामगार नेत्यानं पहिल्यांदा मुंबई बंद पाडली होती. घड्याळाच्या काट्यावर चालणारी ही मुंबई जॉर्ज यांच्या एका हाकेवर थांबली होती. बाळासाहेबांनंतर मुंबई बंद पाडण्याची ताकद ही जॉर्ज यांच्यात होती.
जॉर्ज फर्नांडिस समता पार्टीचे संस्थापक होते. 3 जून 1930 साली जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. इंग्रजीसहित 9 भाषा बोलण्यामध्ये ते  पारंगत होते. तमिळ, मराठी, कन्नड, उर्दू, मल्याळी, तुलु, कोकणी आणि लॅटिन भाषा त्यांना अवगत होती. किंग जॉर्ज यांच्यावरून त्यांचं नाव जॉर्ज फर्नांडिस असं ठेवण्यात आलं होतं.
मंगळुरू इथून जॉर्ज फर्नांडिस यांचं शिक्षण झालं. राम मनोहर लोहिया हे त्यांचे प्रेरणास्त्रोत होते. 1950 पासून ते टॅक्सी ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष होते.
जॉर्ज फर्नांडिस यांचा अल्पपरिचय
- 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी
- ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश
- स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे नेतृत्व
- आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून तुरुंगवास भोगला
- 1977मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत उद्योगमंत्री
- जुलै 1979मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर
प्रभावी भाषण
- पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर विश्वास नाही म्हणून मंत्रीमंडळातून राजीनामा
- 1984च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव
- 1989 मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर
- संयुक्त आघाडी सरकारमध्ये रेल्वेमंत्री
- 1991मध्ये मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलातून विजयी
- 1994मध्ये  नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांसोबत समता पक्षाची स्थापना
- 1996 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाची भाजपबरोबर युती
- 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल नवा पक्ष
- 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये संरक्षणमंत्री
- 2001मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, त्यामुळे मार्च ते ऑक्टोबर मंत्रिमंडळाबाहेर
- ऑक्टोबर 2001मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours