जालना, 29 जानेवारी : आगामी लोकसभा निवडणुका समोर असताना अद्यापही शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची कोणतीही चर्चा झालेली दिसत नाही. पण युतीवर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीकेचा बाण सोडतोय असंच दिसत आहे.
युतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ असा दावा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जालन्यामध्ये सुरू असलेल्या कार्यकारिणीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदु्त्वाच्या मुद्यालादेखील हात घातला.
जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासह नाही तर त्यांच्याशिवाय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेना हाच मोठा भाऊ आहे असं वक्यव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सडकून उत्तर दिलं आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी फक्त शिवसेनाच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीवरही चीका केली. जालनामध्ये आजपासून सुरू झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या परिवर्तन आणि संघर्ष यात्रेचा समाचार घेतला. विरोधकांनी काढलेल्या यात्रांचं नावदेखील आठवत नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी टोला हाणला.
कधीकाळी एकमेकांचं तोंड न पाहणारे मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले आहेत असंही फडणवीस म्हणाले. जालन्यातच झालेल्या दुसऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या महाआडीवर हल्लाबोल केला. 32 पक्ष मिळून तयार होणाऱ्या महाआघाडीचा पंतप्रधान कसा असेल असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी कोटी केली.
दरम्यान, भाजपच्या या राज्य कार्यकारिणी बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गाणं गायलं आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोरसनं साथ दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours