लातूर : लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उजेडात आली आहे. वर्षभरापासून क्रीडा शिक्षक आपल्याच विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेत ही घटना घडली. क्रीडा शिक्षक वर्षभरापासून शारिरीक छळ आणि अत्याचार करत असल्याने कंटाळून एका अल्पवयीन मुलीने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या पीडित मुलगी अहमदपूर येथील एका खासगी दवाखन्यात उपचार सुरू आहे.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षक गणेश बेंबडे याला किनगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी कबड्डीची विभागीय खेळाडू असून तालुक्यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून लौकिक आहे. याचा क्रीडा शिक्षक गणेश बेंबडे याने गैरफायदा घेत अत्याचार केले. गेल्यावर्षभरापासून त्याने या पीडितेवर अत्याचार केले होते.
अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव इथल्या माध्यमिक आश्रम शाळेतील या अल्पवयीन मुलीने शिक्षकाच्या छळवणुकीमुळे पंधरा दिवसापासून शाळा सोडली होती. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून तिने जिवन संपवण्याचा निर्णय घेतला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours