नाशिक, 20 फेब्रुवारी : नाशिकमधील पाथर्डी गावाजवळ असलेल्या पांडनगरीमध्ये 19 वर्षीय तरुणाची निर्घण हत्या करण्यात आली आहे. रितेश पाईकराव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
रितेश पाईकराव याच्यावर मध्यरात्री अज्ञातांनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रितेशचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. मात्र हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट नाही. हत्येमागील कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होऊ शकेल. 19 वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्राने वार करून झालेल्या या हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नाशिमध्ये गुन्हेगारी वेगाने वाढत आहे. जानेवारी ते आतापर्यंतच्या काळातील हा सातवा खून आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस आणी गुन्हे शाखेचे पथकही संशयितांचा शोध घेत होते. गुन्हांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीनंतर संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाने याबाबत वेळीच कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours