मुंबई, 05 फेब्रुवारी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचं मोदी सरकार हा संघर्ष टोकाला पोहचलांय. यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या कट कारस्थानावर तोफ डागली आहे. मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षात देशात घडलेल्या ' चिट इंडिया' प्रकरणाकडे सीबीआयचा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे...? असा सवाल करत बंगाल मधील ठिणगी वाढून देशात अशांतता निर्माण होऊन लोकशाहीच धोक्यात येईल. असं परखड मत सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.
सामना अग्रलेख
'शारदा चिट फंड घोटाळय़ातील आरोपीना सोडता कामा नये, पण गेल्या चार वर्षांत देशात घडलेल्या ‘चिट इंडिया’ प्रकरणाकडे सी. बी. आय.चा अर्धमेला पोपट कोणत्या नजरेने पाहत आहे? श्री. मोदी यांनी कोलकात्यातील दंगल आणि सर्व घटनाक्रमाकडे पंतप्रधान म्हणून पाहावे. ते आधी पंतप्रधान, नंतर भाजपचे नेते आहेत. प. बंगालातील ठिणगी वाढू नये. देशात अशांतता व भयाचे वातावरण निर्माण होणे लोकशाहीला मारक आहे.'
Post A Comment:
0 comments so far,add yours