मुंबई : कार्यक्रम होता अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्याचा. स्थळ मुंबईतलं स्टॉक एक्सचेंजचं सभागृह. अर्थमंत्री पियुष गोयल हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पण त्यांना यायला उशीर झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ला लढवला. त्यानंतर दोनही नेत्यांची जुगलबंदी रंगली.
कार्यक्रमासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी विलेपार्ले ते चर्चगेटपर्यंतचा प्रवास रेल्वेमार्गाने केला. रेल्वेमंत्र्यांसाठी असलेल्या विशेष बोगीतून रेल्वेमंत्री चर्चगेटला पोहचले. या प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. दिल्लीहून त्यांचं विमान उशीरा मुंबईत पोहोचलं. त्यानंतर त्यांना बॉंम्बे स्टॉक एक्सचेंजच्या कार्यक्रमात जायचं असल्याने त्यांनी ट्राफिक टाळण्यासाठी रेल्वेनेच येणं पसंत केलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours