08 फेब्रुवारी: लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील शालेय शिक्षण सभापती रुईकर यांच्या घरातील पाच मुलींना दुधातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात तीन वर्षीय जुळ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.

इतर दोन बहिणीला प्रकृती गंभीर असल्याने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे तर पाचव्या बहिणीची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अयुब रशिद रुईकर यांच्या पाच मुलीला आज दुपारपासून दूध पिल्याने त्यातून उलटी, संडास आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours