जिल्हा प्रतिनीधी : शमीम आकबानी) 
नागपूर, दि.26 : लोकसभेच्या नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. त्यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदार संघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील पिपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. छाननीनंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात 20 तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 33 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नागपूर लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत झाली. तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर पार पडली.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील. तुमाने गोपाल अजाबराव (अपक्ष), दिपचंद शेंडे (अपक्ष), मिनाताई करणसिंह मोटघरे यांचा समावेश आहे. तर सचिन शेंडे पिपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज परत घेतला आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी 39 उमेवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. छाननीमध्ये सहा उमेदवारी अर्ज रद्द ठरले आहेत. रद्द ठरलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये खुशबू बेलेकर (बळीराजा पार्टी),  आनंदराव खोब्रागडे (अपक्ष), मंसूर जयदेव शेंडे (अपक्ष), निलेश महादेव ढोके (अपक्ष), योगेश रमेश जयस्वाल (विश्वशक्ती पार्टी) आणि कृष्णराव निमजे (अपक्ष) (दोन अर्ज) यांचा समावेश आहे.

चंद्रपूर - चार अर्ज अवैध

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये आज 26 मार्च रोजी अर्जाच्या छाननीनंतर 17 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून अन्य 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

 अवैध नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांमध्ये रमेश मारोतराव कडुकर (अपक्ष),  अभिजीत राजू बेल्लालवार (अपक्ष), अभिनंदन महादेव भेंडाळे (अपक्ष)आणि  दामोदर श्रीराम माथने (भारतीय मानवाधिकार पार्टी) यांचा समावेश आहे.

गडचिरोली-चिमूर -  चार अर्ज अवैध

लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर मतदारसंघांमध्ये आज 26 मार्च रोजी अर्जाच्या छाननीनंतर  चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

अवैध नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांमध्ये नेवारे दामोधर वानुजी (अपक्ष), सुवर्णा बबनराव वरखडे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), पवन रामचंद्र मगरे (बहुजन समाज पार्टी), दिवाकर गुलाब पेंदाम (बहुजन मुक्ती पार्टी)  यांची नामनिर्देशनपत्रे छाननीअंती नाकारण्यात आली आहेत.

भंडारा-गोंदिया -  अकरा अर्ज अवैध

लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया मतदारसंघांमध्ये आज 26 मार्च रोजी अर्जाच्या छाननीनंतर   23उमेदवारांचे  अर्ज वैध ठरले असून अन्य 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.

अवैध नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांमध्ये रमेश जिवलंग खोब्रागडे (अपक्ष), अनिल बावणकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुरेश तुकाराम टिचकुले (अपक्ष), कुलदिपसिंह बिरसिंह बाच्छील (अपक्ष), राजेश निळकंठ चोपकर (अपक्ष), डॉ. परिणय फुके (भारतीय जनता पार्टी), धनंजय श्यामलालजी राजभोज (अपक्ष), रामविलास शोभेलाल मस्करे (अपक्ष), मनोहर बिसनजी मते (बहुजन मुक्ती पार्टी), रामलाल गोस्वामी (अपक्ष), अनिल दयाराम मेश्राम (अपक्ष).
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours