वाघा बॉर्डर, 02 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे अखेर भारतात परतले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण देश त्यांच्या या रिअल हिरोची वाट पाहत होता. अखेर शुक्रवारी रात्री 9:15 मिनिटांनी अभिनंदन यांनी पाकिस्तानची हद्द पार करत भारतात प्रवेश केला. याआधी कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचं कारण देत पाकिस्तानने अभिनंदन यांचा भारतातला प्रवेश लांबवला.
वाघा बॉर्डरवर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या ताब्यात सोपवलं. यावेळी सगळ्यात आधी 'आता छान वाटतं आहे' असं अभिनंदन म्हणाले. अभिनंदन यांच्या मायदेशी परतल्याने जो आनंद अवघ्या देशाला झाला होता तोच आनंद आणि आपल्या देशाप्रती असलेला अभिमान हा या ढाण्या वाघाच्या डोळ्यांत दिसत होता.
बॉर्डवर भारताकडे आल्यानंतर सगळ्यात आधी अभिनंदन यांना अमृतसरहून दिल्लीला आणण्यात आलं. त्यांना वायुदलाच्या विमानाने पालम एअरपोर्टवर आणण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे तर शनिवारी भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours