मुंबई: बॉलिवूड अभिनेत्यांसोबत फोटोशूट करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही याला अपवाद ठरले नाहीत. मुंबई विमानतळावर काँग्रेस नेत्यांनी अभिनेता सलमान खान याच्यासोबत फोटोशूट केलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या विमानातळावर गेलेल्या काँग्रेस नेत्यांनी अचानक भेटलेल्या सलमानसोबत फोटोशूट केलं आहे. राहुल गांधी यांची वाट पाहात असताना ही भेट झाली आहे.
दरम्यान, राहुल गांधी आज मुंबई आणि धुळे याठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे राहुल गांधी नेमकं काय बोलतात? काय भूमिका घेतात हे देखील पाहावं लागणार आहे. धुळे हा केंद्रीय मंत्री सुभाष भांबरे यांचा मतदारस संघ आहे. याच ठिकाणाहून राहुल गांधी लोकसभा प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. धुळे येथे दुपारी 3 वाजता सभा घेतल्यानंतर राहुल गांधी मुंबईकडे रवाना होतील. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता बीकेसी मैदानावर राहुल गांधी सभा घेतील.
मुंबई काँग्रेसमध्ये सध्या वाद असून यावादाचं प्रदर्शन राहुल गांधी यांच्यापुढे होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं कार्यकर्त्यांना वाटतंय. पण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीमध्ये आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours